Cr7 रोनाल्डो आणि धर्मसंकट

      Cr7 रोनाल्डो धर्मसंकटात



             रोनाल्डो या नावाची व्युत्पत्ती मुळातच क्रीडा विश्वात मानाचं अढळस्थान असलेल्या फुटबॉल या क्षेत्रात झाली.
             अगदी असंख्य अबालवृद्धाच्या गळ्यातील तो ताईत आहे आणि होता ...पण याला आता ग्रहण लागले आहे त्याच तेजोवलय कमी होत चालललय याची प्रचिती नुकत्याच झालेल्या सौदी अरेबियन फुटबॉल लीगनंतर आला ...
एका मोठा घसघशीत पैसा मोजून करार केलयनंतर रोनाल्डो सौदी लीग मध्यें सहभागी झाला.. मात्र इथंही यशाने त्याला हुलकावणी दिली ..व त्याच्या "अल नासर' संघाला मानहानीकारक पराभूत होऊन लीग मधून बाहेर पडावं लागलं आणि पुन्हां रोनाल्डो च्या भविष्या विषयी  चर्चांना उधाण आलं
                  यामागे इतिहास मोठा आहे मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल क्षेत्रातल्या बड्या क्लब सोबत घेतलेला पंगा ..आणि आणि ऐन कतार विश्वचषका दरम्यान प्रसिद्ध झालेला इंटरव्ह्यू त्यात झालेले आरोप प्रत्यारोप ...दरम्यान आपल्या करिअर मध्ये  सर्वाधिक काळ सलग्न राहिलेल्या आणि आणि दरम्यानच्या कारकिर्दीत कमालीचं यश मिळवणाऱ्या क्लब सोबतच नातं तोडलं त्याचवेळी करार मुक्त झाल्यानंतर युरोप मधील कुठलाच क्लब त्याला करारबद्ध करण्यास इच्छुक नव्हता ...लालीगा , प्रीमियर लीग , सरी ए सारख्या स्पर्धामध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या रोनाल्डो ला अखेर सौदी अरब च्या "अल नासर " या फुटबॉल क्लब ने साथ दिली व रेकॉर्ड ब्रेक किमतीच्या करारासह आपल्या संघात सामावून घेतलं 
                     या सर्व घडामोडी घडत असतानाच तुर्की चे अध्यक्ष रेसेप तयब एर्दोगन यांनी एका ठिकाणी रोनाल्डो संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की रोनाल्डो ने पॅलेस्टाईन ला समर्थन दिल्याने त्याला विश्वचषक वेळीं महत्वाच्या सामन्यात जाणूनबुजून बाकावर बसवलं. आणि युरोप मधील अनेक स्पर्धा एकहाती फिरवण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू राजकीय वजन ठेवणाऱ्या युरोपातील प्रसिद्ध क्लब च्या सामूहिक बहिश्कृतास्त्र चा बळी ठरला.

                     राजकीय वजन असलेले युरोपातील हे क्लब राष्ट्रीय राजकीय धोरणांच्या विरोधात जाऊ शकत नसतात कारण त्यांची आर्थिक चावी ही सरकारकडे असते .
युरोपातील बहुतेक देशांच इस्राएल बद्दल धोरण हे उघड आणि सर्वसृत आहे त्यामुळे "दगडापेक्षा विट मऊ" म्हणून रोनाल्डो नामक वाद हा राष्ट्रीय धोरणाचा विषय म्हणून स्वतंत्र राहणं पसंत केलं आणि त्याचा सारख्या प्रतिभावन आणि किमयागारीची क्षमता आणि  चाहत्यांच मोठं वलय असणाऱ्या खेळाडुला आपल्या संघात घ्यायला धजावल नाही .....यामध्यें पडद्याआड काही राजकारण झाल "पडद्याआड मोहरे हालवले गेले आणि कोणी परकी मातबर शक्तीने रोनाल्डो नामक शक्तीला चितपट केलं . 
                    यातून एक स्पष्टपणे समजते की सीमा , रेषा , धर्म जाती यापासून दूर असलेला खेळ ज्याला आपण " निधर्माच प्रतिक म्हणतो त्याला राजकारणात आणन किती योग्य आहे आणि यातून मुख्य हेतू काय साध्य होणार हा येणारा काळच सांगेल. 
                                     
Mahesh Wadhavne
Maheshwadhavne@gmail.com
8830223118

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हॉलीवूडच्या किम ची किमया