हॉलीवूडच्या किम ची किमया

           हॉलिवूडची रातराणी


             आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रात डोकावलं.... तर आपल्याला आवडत्या स्टार बद्दल जाणून घेण्याची सवय असते मग आपण त्यावर शोधत असतांना त्याविषयीची तथ्य तथा तथ्यविरहीत अशा दोन्ही गोष्टी सातत्याने आपली स्क्रिन स्क्रोल करत असताना दिसतात..यामागे Artificial intelligence नामक त्रयस्थ यंत्रणा आपल्या "अल्गोरिदम" च्या माध्यमातून चोवीस तास काम करत असते .
            ' किम कर्दशीण ' ही हॉलिवूड ची सुप्रसिद्ध मॉडेल तिणे केलेली  प्रत्येक गोष्ट ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बातमी होते तसेच तिच्या "बोल्ड" अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनते.
           जगातील सर्व स्तरावर तिची लोकप्रियता आहे तिची उंची राहणी आणि "बिलिनीयर्स लाइफस्टाइल" याबद्द्ल खूप चर्चा होते ... ख्यातनाम "मॅगझीन" च्या मुखपृष्ठवर ठळकपणे दिसणारी आणि "हॉलिवूड" ची "बिकिनी गर्ल" म्हणून ती प्रसिध्द आहेचं पण आता एका वेगळ्याच कारणामुळे ती पुन्हा प्रसिध्दी च्या झोतात आलीय
            "किम कर्दशीण " या हॉलिवूड च्या मॉडेल ने असा एक विक्रम आपल्या नावावर केला . यावरून तिची लोकप्रियता स्पष्ट होते . 
             "फॉक्स न्युज" ने दिलेल्या बातमीत म्हटलं की जागतिक स्तरावर झालेल्या एकूण " गुगल " सर्च मध्ये     "जागतिक हवामान बदल " सारख्या अत्यंत महत्वाच्या आणि संशोधनाच्या गोष्टी पेक्षा जास्त शोधलं गेलं ते नाव म्हणजे " किम कर्दशीण" 
        यावरूनच आपली "बौद्धिक पातळी" आणि त्यावर असणारा स्टार्स चा "पगडा" हा सिद्ध होतो.

Mahesh Wadhavne
MaheshWadhavne@gmail.com
8830223118

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Cr7 रोनाल्डो आणि धर्मसंकट